बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात कियाराने कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डिंपल चीमा यांची प्रतिक्रिया काय होती हे कियाराने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कियाराने नुकतीच ‘मिड डे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत कियाराने डिंपल यांना चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी भेटण्यापासून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कियाराने डिंपल यांना मेसेज केला होता. “डिंपल यांच्यासाठी हा भावनिक चित्रपट आहे. मला त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करायचा आहे. चित्रपटानंतर जेव्हा मी कॅप्टन बत्रा यांच्या कुटुंबाला भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की मी अगदी डिंपल यांच्यासारखीच आहे. त्यावेळी माझे अश्रू अनावर झाले. मला याची जाणीव आहे की चित्रपटात असलेल्या गाण्यांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. त्यांना अभिमान आहे की त्यांच्या कहाणीने प्रत्येकाची मने जिंकली आहेत,” असे कियारा म्हणाली.

आणखी वाचा : अक्षय कुमारला बसला धक्का, प्रदर्शनाच्या काही तासातच ‘बेल बॉटम’ लीक

या आधी ‘डीएनए’ला कियाराने मुलाखत दिली होती त्यावेळी कियारा म्हणाली, ‘कारगिल युद्ध झाले तेव्हा ती खूप लहान होती आणि इतक्या खोलवर तिला याबद्दल माहित नव्हते. डिंपल यांना भेटल्यानंतर, देशाची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यासोबत रिलेशनमध्ये असने भावनिक गुंतागुंतीचे असते. एका नागरिक म्हणून, एका योद्धाची पत्नी असणे अकल्पनीय आहे.’

आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स व्हायरल

‘शेरशाह’ हा चित्रपट १२ ऑगस्टला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धा दरम्यान देशाची सेवा करताना शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.