छोट्या पडद्यावरील ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ या लोकप्रिय कार्यक्रमातील ‘पलक’ फेम किकु शरद याला डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांची नक्कल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. किकु शर्मा ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’मध्ये साकारत असलेले पलक हे पात्र प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या २७ डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागात किकुने बाबा राम रहीम यांची नक्कल केली होती. मात्र, यामुळे बाबा राम रहीम यांच्या अनुयायी वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप घेत १ जानेवारीला हरियाणा पोलिसांत तक्रार किकुविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, टेलिव्हिजनवर हा भाग प्रसारित झाल्यानंतर किकुने ट्विटरच्या माध्यमातून बाबा राम रहीम आणि त्यांच्या अनुयायांकडे दिलगिरीही व्यक्त केली होती. सध्या किकुची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Story img Loader