रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन रस्त्यावरील कार दुर्घटनेत केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचली. ही दुर्घटना घडली तेव्हा किमची मुलगी नॉर्थ वेस्टदेखील तिच्याबरोबर होती. त्याशिवाय किमच्या बहिणी केली जनेफर आणि कोल कर्दाशियनसुद्धा किमबरोबर या गाडीतून प्रवास करत होती. ‘ईऑनलाईन डॉट कॉम’ वेबसाईटवरील वृत्तानुसार ३४ वर्षीय किमने मोंटावामध्ये घडलेल्या या दुर्घटनेबाबतचा अनुभव टि्वटरवर कथन केला आहे. या दुर्घटनेत सहीसलामत बचावल्याने तिने देवाचे आभार मानले आहेत. शनिवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत किम केली, कोल आणि नॉर्थला घेऊन गाडीतून प्रवास करत असताना, अचानक गाडीच्या पुढील काचेवर बर्फाचा एक मोठा तुकडा येऊन आदळला. गाडीच्या पुढील काचेवर येऊन पडलेल्या या बर्फाच्या तुकड्यामुळे समोरचा रस्ता दिसणे बंद झाले आणि केवळ नशिबानेच कार दरीत कोसळता कोसळता वाचली. काही वेळातच दुर्घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गाडी अथवा अन्य कोणाला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगितले.
(सौजन्य – टि्वटर)
किम कर्दाशियन दुर्घटनेतून बचावली
रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन रस्त्यावरील कार दुर्घटनेत केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचली.
First published on: 23-02-2015 at 05:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kim and khloe kardashian involved in car crash