हॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून अभिनेत्री किम कार्दशियनकडे पाहिलं जातं. किम तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य, लीक होणारे खासगी व्हिडीओ आणि बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. यावेळी किमवर हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचे आरोप करण्यात आले आहे.
किमने नुकतेच एक फोटोशूट केले. त्याचे काही फोटो तिने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये किम गुलाबी रंगाच्या बेड वर असल्याचे दिसत आहे. लाल रंगाचा प्रिटेड ड्रेस किमने परिधान केला आहे. तर त्यासोबत किमने ओम हे धार्मिक चिन्ह कानातले म्हणून घातले आहे. यामुळे किम ट्रोल झाली आहे.
— Kim Kardashian West (@KimKardashian) May 23, 2021
किमचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे किम ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की किमने परिधान केलेले कानातले हे धार्मिक प्रतिक आहे, जे असे परिधान केले जाऊ शकतं नाही. एक नेटकरी म्हणाला, “ओम हिंदूंसाठी एक पवित्र प्रतीक आहे आणि फक्त एक एक्सेसरीसाठी नाही आणि हे सांगण्यासाठी हा चांगला काळ आहे का?” दुसरा नेटकरी म्हणाला, “हे सेलिब्रिटीज सांस्कृतिक प्रतीक वापरणे कधी थांबवतील? हे लाजिरवाणे आहे,” अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी किमला ट्रोल केले आहे.
आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?
गेल्या वर्षी २०२० मध्ये, मांग टिका आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून फोटोशूट केल्याने किम कार्दशियन ट्रोल झाली होती. एवढंच नाही तर किम कार्दशियन घटस्फोटाच्या मुद्द्यावरून ही चर्चेत होती. किम आणि अभिनेता कान्ये वेस्ट यांनी १९ फेब्रुवारी २०२० रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना चार मुले आहेत. कान्ये वेस्टने किम कार्दशियनकडून मुलांच्या संयुक्त ताब्याची मागणी केली आहे.