Kim Kardashian Travels In Auto Rickshaw : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यात अनेक परदेशी पाहुणे सहभागी होणार आहेत. हा भव्य समारंभ आज (१२ जुलै) बीकेसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शनमध्ये पार पडणार आहे. यासाठी अब्जाधीश किम कार्दशियन पहिल्यांदाच भारतात आली आहे. किमचं मुंबईच्या विमानतळावर आगमन होताच तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. किमबरोबर तिची बहीण ख्लोई सुद्धा भारतात आली आहे.
किम व ख्लोई गुरुवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दाखल झाल्या. या दोघींचं भारतात आगमन झाल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. किम पहिल्यांदाच भारतात आल्याने तिचा हा पहिला भारत दौरा संस्मरणीय ठरण्यासाठी अंबानी कुटुंबीयांनी खास तयारी केली होती. किमचं पंचतारांकित हॉटेलवर भारतीय परंपरेनुसार स्वागत करण्यात आलं. औक्षण केल्यावर तिच्या हातात पुष्पगुच्छ देऊन किमचं भारतात आदरातिथ्य केल्याचं पाहायला मिळालं. आता किमचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Anant-Radhika Wedding: लग्नात फक्त एक गाणं गाण्यासाठी ‘Baby Calm Down’ फेम गायकाचे मानधन तब्बल…
पहिल्यांदाच भारतात आलेल्या अब्जाधीश किम कार्दशियनने चक्क रिक्षातून प्रवास केला आहे. याचा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी तिच्या बरोबर तिची बहीण ख्लोई देखील होती. जगातील एवढ्या श्रीमंत महिलेने भारतात येऊन चक्क रिक्षातून प्रवास केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
रिक्षातून प्रवास करताना किम कार्दशियनने कपाळावर टिकली लावल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात आल्यावर येथील संस्कृती जपल्यामुळे तिचं कौतुक करण्यात येत आहे. आता किम अंबानीच्या लग्नसोहळ्यात काय लूक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा : Video : हर हर महादेव…; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी अँटिलियावर ‘अशी’ पार पडली शिव शक्ती पूजा, Unseen Video आला समोर
हेही वाचा : अनंत-राधिकाच्या लग्नात ऐतिहासिक काशी शहराची प्रतिकृती! पहिली झलक दाखवत नीता अंबानी म्हणाल्या…
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी खास प्रियांका चोप्रा, किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल यांसारखे परदेशी पाहुणे भारतात दाखल झाले आहेत. दरम्यान, १२ जुलै ते १५ जुलैपर्यंत हा लग्नसोहळा मुंबईत पार पडेल. शुक्रवार १२ जुलै रोजी ( सायंकाळी) अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. तसेच रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.