प्रसिद्ध अमेरिकन रिअॅलिटी शो स्टार किम कार्दशियन तिच्या फॅशन आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. किम बऱ्याच वेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता किमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असेच एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे किम सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.

किमने नुकतीच न्यूयॉर्क टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की ती तरुण दिसण्यासाठी काय करू शकते? यावर उत्तर देत किम म्हणाली, “मी काहीही करेन. जर तुम्ही मला सांगितले की मला तरुण दिसण्यासाठी रोज विष्ठा खावी लागेल, तर कदाचित मी ते देखील करू शकते.” किमच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा : अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगत रितेश देशमुख, म्हणाला “मामांसोबत…”

आणखी वाचा : “असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे…”, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावरून केआरकेने केली अक्षय कुमारवर टीका

किमच्या या वक्तव्यावर एक नेटकरी म्हणाला, ‘मला असे का वाटते की किमने हे केले आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिचं डोकं काम करतं नाही. किमच्या चाहत्याने कमेंट केली की, ‘अरे किम, आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो पण तू अशा गोष्टी का बोलतेस? का?’

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

या आधी किम पती आणि रॅपर कान्ये वेस्ट घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर किमने कॉमेडियन पीट डेव्हिडसनसोबत रिलेशनशिपमध्ये आली. किम आणि पीट बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. अलीकडेच किमने तिची नवीन ब्युटी लाइन आणि परफ्यूम ब्रँडही लॉन्च केला आहे.

Story img Loader