देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींचा लाडका मुलगा अनंत अंबानी गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकला. मोठ्या थाटामाटात अनंत अंबानीचं लग्न राधिका मर्चंट हिच्याशी झालं होतं. या लग्नासाठी वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान, हॉलीवूड, बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकीय नेतेमंडळी मुंबईत दाखल झाले होते. यावेळी अंबानी कुटुंबाकडून पाहुणे मंडळींचं खास स्वागत केलं होतं. जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणींनी अनंत अंबानीच्या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

किम कार्दशियन व क्लोई कार्दशियन या दोघींनी अनंत अंबानींच्या लग्नात खास हजेरी लावली होती. ११ जुलैला दोघी मुंबईत दाखल झाल्या होत्या. अंबानींकडून दोघींचं पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आलं होतं. याच किम कार्दशियन व क्लोई कार्दशियन सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. अमेरिकेची लोकप्रिय टीव्ही रिअ‍ॅलिटी सीरिज ‘द कार्दशियन’च्या सहाव्या सीझनमध्ये दोघींनी अनंत अंबानींच्या लग्नातील अनेक खुलासे केले आहेत. अनंतच्या शाही लग्नसोहळ्यात किमच्या नेकलेसमधला महागडा हिरा हरवलेला, हा नवा खुलासा किमने केला आहे.

या सीरिजमध्ये क्लोईने सांगितलं, “जेव्हा मी किमशी बोलायला जात होती. तेव्हा तिच्या नेकलेसमधला हिरा अचानक पडला. मला आश्चर्याचा धक्काच बसला.” पुढे किम कार्दशियन म्हणाली, “आम्ही सगळीकडे शोधला. माझ्या टॉपमध्ये शोधला, स्कर्टमध्ये शोधला. पण कुठेच मिळाला नाही. मला असं झालं, अरे देवा. हे आमच्याबरोबर काय घडलं.”

१६ मार्चला अमेरिकेतील ज्वेलरी इन्फ्लुएन्सर ज्युलिया चाफने आता किम कार्दशियनच्या हरवलेल्या हिराची किंमत सांगितली. तिने एक सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. “अंबानीच्या लग्नात किम कार्दशियनचा हिरा सापडला का?” असं कॅप्शन लिहित तिने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ज्युलियाने किमच्या हरवलेल्या हिऱ्याची किंमत सांगितली. १ दशलक्ष इतकी किंमत किम कार्दशियनकडून हरवलेल्या हिऱ्याची किंमत आहे.

दरम्यान, ‘द कार्दशियन’ या अमेरिकेच्या लोकप्रिय टेलिव्हिजन सीरिज कार्दशियन कुटुंबातील वैयक्तिक आयुष्यावर आधारित आहे. याचा पहिला सीझन २०२२मध्ये प्रदर्शित झाला आहे. यावेळीस नवा सीझन Huluवर स्ट्रीम झाला आहे. याचा प्रत्येक गुरुवारी नवा भाग प्रदर्शित होतं आहे. या शोमध्ये क्रिस जेनर, किम कार्दशियन, क्लोई कार्दशियन, कोर्टनी कार्दशियन, केंडल जेनर आणि काइली कार्दशियन आहेत. याशिवाय या शोमध्ये स्कॉट डिस्किक, नॉर्थ वेस्ट, ट्रैविस बार्क आणि कुटुंबातील दुसरे सदस्य आणि मित्रांचे कॅमिओ आहे.

Story img Loader