बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिसपटू लिएंडर पेस मागच्या काही काळापासून त्याच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आपल्या नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर लिएंडर आणि किम नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशात आता हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. काही रिपोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही वर्षांच्या यशस्वी रिलेशनशिपनंतर लिएंडर आणि किम यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार किम आणि लिएंडर यांचं हे लग्न कोणत्याही भव्य समारंभाप्रमाणे होणार नाही. हे दोघंही अत्यंत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करणार आहेत. दरम्यान अद्याप यावर लिएंडर किंवा किम यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण या दोघांच्या लग्नाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा- “त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये…” लैंगिक अत्याचारांबद्दल सांगताना ढसाढसा रडली जॉनी डेपची पत्नी

मीडिया रिपोर्टनुसार किम शर्मा आणि लिएंडर पेस यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांची भेट घेतली असून त्यांनी या दोघांच्याही नात्याला होकार दिला आहे. एवढंच नाही तर लिएंडर आणि किम त्यांच्या वांद्रे येथील घरात कोर्ट मॅरेज करणार असल्याचंही बोललं जातंय. मात्र या दोघांच्या अधिकृत घोषणेनंतरच हे दोघं लग्न कधी करणार हे स्पष्ट होणार आहे. अर्थात दोघांच्याही कुटुंबीयांनी एकमेकांना भेटण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. त्याआधी दोघांचेही कुटुंबीय कोलकातामध्ये एकमेकांना भेटले होते.

आणखी वाचा- “सर्वात आधी आपण सगळे भारतीय…” बॉलीवूड विरुद्ध साऊथ वादावर सई ताम्हणकरचं परखड मत

दरम्यान किम शर्माचं लिएंडर पेससोबत हे दुसरं लग्न असणार आहे. किम शर्मानं २०१० मध्ये बिझनेसमन अली पुनजानीशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर तिचं नाव क्रिकेटपटू युवराज सिंहशी जोडलं गेलं होतं. पण आता मागच्या काही वर्षांपासून ती टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करत आहे.

Story img Loader