बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या अफेअरच्या सध्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांचे एकत्र फिरतानाचे गोव्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी किम अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत होती. आता किम आणि लिएंडर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हर्षवर्धनने प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी किमचा एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धन राणेचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच या चित्रपटामुळे हर्षवर्धन देखील चर्चेत आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये हर्षवर्धनने एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा आणि लिएंडर पेस यांच्या रिलेशनशीपवर त्याचे मत मांडले आहे.

आणखी वाचा : ‘तापसीसोबत इंटिमेट सीन शूट करताना…’, हर्षवर्धन राणेने सांगितला अनुभव

हर्षवर्धनने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला, ‘मला किम आणि लिएंडर यांच्या रिलेशनशीप विषयी काही माहिती नाही. पण जर हे खरे असेल तर चांगली गोष्ट आहे. तिने स्वत: तिच्या रिलेशनशीप विषयी सांगितले असते तर चांगले झाले असते.’

किम आणि हर्षवर्धन गेली कित्येक वर्षे त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत होते. त्या पूर्वी किम क्रिकेटपटू यूवराज सिंहला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होत. पण २००७ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. आता किम लिएंडर पेसला डेट करत आहे.

Story img Loader