‘मानिनी’, ‘दोन घडीचा डाव’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप,’ ‘हुतूतू’  ‘मोकळा श्वास’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘तुक्या तुकवला नाग्या नाचवला’  असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट केल्यानंतर निर्मात्या, दिग्दर्शिका कांचन अधिकारी पुन्हा एकदा हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’  असे काहीसे वेगळे शीर्षक असलेला त्यांचा हा आगामी चित्रपट प्रेमकथेवर बेतला आहे. नातेसंबधावर भाष्य करतानाच प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे हा चित्रपट उलगडून दाखवतो.  जीवनात प्रत्येकाचा एक दृष्टीकोन असतो. त्यामुळे दुसऱ्याचा दृष्टीकोन हा आपल्याला नेहमीच वेगळा वाटतो. हा दृष्टीकोन कधी पटतो तर कधी पटत नाही. यावरही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
ओम प्रॉडक्शन निर्मित व कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’ या चित्रपटातील एका गीताचं ध्वनिमुद्रण आजीवासन स्टुडिओमध्ये नुकतंच करण्यात आलं. गीतकार कांचन अधिकारी आणि वैशाली सामंत यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला संगीतकार वैशाली सामंत यांनी संगीतबद्ध केले असून हिंदी सारेगमप संगीत स्पर्धेतून महागायक बनलेल्या जसराज जोशी यांचा वेगळ्या धाटणीचा ठसकेदार, खडा आवाज या गीताला लाभला आहे.  संगीत संयोजकाची जबाबदारी कमलेश भडकमकर व जसराज जोशी यांनी सांभाळली आहे.
‘चेहरा न राहिला मजला सावली नसे साथीला’ असे या गीताचे बोल आहेत. हे गीत गाताना त्यांमध्ये असलेली घालमेल मला जाणवली आणि ऐकताना श्रोत्यांनाही  ती निश्चितच जाणवेल, असं गायक जसराज जोशी म्हणाले.  वैशाली सामंत यांनी उत्तम गीताला  कर्णमधुर संगीताची जोड देत एक चांगल गीत प्रेक्षकांसाठी आणलं आहे. मानवी नात्याची गुंतागुंत दाखवतानाच प्रत्येक नात्याची ही एक बाजू असते. या गुंतागुंतीच्या नात्यातील भावबंधाचे एक एक धागे या गीतातून उलगडत जातात.
कांचन अधिकारी व ओम गह्लोट निर्मित या चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे, क्रांती रेडकर, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट रसिकांना नक्की भावेल असा विश्वास निर्मात्या व दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader