काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरवर्षी २७ फेब्रुवारीला म्हणजे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यावरून अभिनेता किरण माने यांनी तिला ट्रोल केलं आहे.
अभिनेता किरण माने काही दिवसांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर झालेल्या वादामुळे चर्चेत होते. त्यानंतर आता सोनालीच्या पोस्टवर कमेंट केल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. सोनालीनं मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिलं, ‘न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!’
आणखी वाचा- फरहानशी लग्नानंतर प्रेग्नन्सीच्या चर्चांवर शिबानी दांडेकरनं सोडलं मौन, म्हणाली…
सोनालीच्या पोस्टवर कमेंट करताना किरण माने यांनी लिहिलं, ‘उच्चार चुकवणाऱ्यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायम न ला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम…या नाट्यांना प्रमाण भाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची.’
आणखी वाचा- Video : शो सुरू असतानाच शिल्पानं रोहित शेट्टीच्या अंगावर फोडली काचेची बाटली अन् …
सोनालीची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. पण या पोस्टवर अभिनेता किरण माने यांनी कमेंट केल्यानंतर सोनाली सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. एवढंच नाही तर तिनं नंतर ही पोस्ट सोशल मीडियावरून डिलिटही केली. मात्र तोपर्यंत सोनालीची पोस्ट आणि त्यावरील किरण माने यांची कमेंट याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.