काही दिवसांपूर्वी अभिनेता किरण माने हे मुलगी झाली हो या मालिकेमुळे चर्चेत होते. किरण माने हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच किरण माने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांची प्रतिक्रिया आणि त्यांच्या प्रेमा विषयी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण मानेंनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या व्हिडीओत त्यांनी एका गावात भेट दिल्याचे दिसत आहे. त्यांना पाहून गावकऱ्यांना किती आनंद झाला हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “महाराष्ट्रभर जाईल तिकडं लै लै लै प्रेम मिळतंय मला. भारावून गेलोय. हेरवाडला एक भगिनी आली आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाली,’तुमी लै आवडता आमाला.. तुमी नाय तर शिरेल बगायची बंद केली आमी. लै जीव तुटला आमचा तुमच्यासाठी. तुमाला वाईटसाईट बोलनार्‍या समोर आल्या तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन मी.’ मी हसलो. म्हन्लो,’उलट आभार मानूया त्यांचे ताई. त्यामुळं मला कळलं तुम्ही किती अफाट प्रेम करता माझ्यावर. माफ करा त्यांना,” असे कॅप्शन किरण मानेंनी दिले आहे.

आणखी वाचा : ‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

पुढे किरण माने म्हणाले, “…काल माणगांवच्या ‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती’च्या कार्यक्रमाआधी, आम्हा सर्वांना त्या ठिकाणाला भेट द्यायची उत्सूकता होती, जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी जिथं ‘माणगांव परीषद’ घेतली होती ! तिथं गेलो, तेवढ्यात मी आल्याची बातमी आंबेडकर भवनाच्या आसपासच्या घरांत पसरली. मला बघायला लोक घराबाहेर येऊन उभे राहीले…मनात आलं, तुमच्यासाठी व्हिडीओ काढावा ! बघा….” किरण मानेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane fan emotional after meeting him post viral dcp