निर्माता निर्देशक होण्यापूर्वी किरण रावने २००१ साली प्रदर्शित झालेल्या दिल चाहता है चित्रपटात काही मिनिटांसाठी भूमिका केली होती. पण, किरण अभिनय क्षेत्रात पुन्हा येण्यास नकार देत आहे. सुपरस्टार आमिर खानची पत्नी ३९ वर्षीय किरण राव म्हणाली की, मी अभिनयाकडे कधीही करियर म्हणून पाहिले नाही, मात्र आवड म्हणून अभिनय करण्यास मी नकारही देत नाही. किरण म्हणाली की, मला माहित नाही मी चांगला अभिनय करु शकते का नाही. पण महाविद्यालयात असताना मला स्टेजवर अभिनय करणे आवडत होते. तो माझ्यासाठी मजेशीर आणि चांगला अनुभव होता. एक छंद म्हणून अभिनय करण्यास आवडेल पण करियरसाठी याची मी निवड करणार नाही.
आजकाल किरण ही आनंद गांधी यांच्या शीप ऑफ थिसीसच्या जाहिरातीत गुंतलेली असून या चित्रपटाचे भारतात वितरण होणार आहे. हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. सदर चित्रपटाच्या जाहिरातीकरिता किरण इतर योजनांच्या प्रयत्नात आहे. केवळ आर्थिक कारणांसाठी नाही तर कलात्मक चित्रपटांमध्ये असलेल्या ऱुचीमुळे आपण या चित्रपटाचे समर्थन करत असल्याचे किरणने सांगितले. सध्या किरणचा मुलगा आजाद याच्यामध्ये ती गुंतलेली असून तिला याचा फार आनंद होत आहे. पण, आता पुन्हा कामाकडे वळण्याची वेळ आली असल्याचे ती म्हणाली.

Story img Loader