अभिनेता अनिल कपूर १९८०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खूबसूरत’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती करत आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत त्यांची मुलगी सोनम कपूर आहे. या चित्रपटातील गाजलेली रेखाची भूमिका सोनम कपूर साकारणार असल्याची चर्चा होती. आता मात्र, सोनमची भूमिका वेगळी असल्याचे समोर आले आहे.
ऐंशीच्या दशकातील ‘खूबसूरत’ या चित्रपटात रेखाने साकारलेली भूमिका आता अभिनेत्री किरण खेर साकारणार असून सोनम त्यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा शशांक घोष यांनी सोनमसाठी चित्रपटाचे कथानक लिहायला घेतले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की आजच्या काळानुसार रेखाची भूमिका जुनी आहे. आजच्या काळात ती भूमिका फिट बसत नाही. याशिवाय दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जींच्या चित्रपटांचे चाहते असलेले अनिल कपूर मूळ पात्राला कायम ठेऊ इच्छित होते. त्यामुळे कथानकात बदल करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी रेखा यांना विचारणा झाली होती. मात्र त्यांनी ही भूमिका नाकारल्यानंतर किरण खेरचे नाव चित्रपटासाठी निश्चित झाले. यावर सोनम म्हणाली की, ‘किरणजी या चित्रपटात मंजू हे पात्र साकारणार आहेत. मूळ चित्रपटात ही भूमिका रेखा यांनी साकारली होती. या चित्रपटाविषयी आता मी एवढेच सांगू शकते.’
‘खूबसूरत’मध्ये रेखाच्या भूमिकेत दिसणार किरण खेर
अभिनेता अनिल कपूर १९८०मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खूबसूरत' या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती करत आहे.
First published on: 04-04-2014 at 06:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirron kher plays rekha in khubsoorat