चित्रपटाच्या जगात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काही गोष्टींची अत्यावश्यकता लागते. एक म्हणजे फिटनेस, विविध प्रकारच्या धावपळीतून आपली दमछाक होवू द्यायची नसते आणि दुसरे म्हणजे स्वत:ला सतत बिझी ठेवणे, सतत प्रकाशात असलेल्या कलाकाराला नवीन ऑफर मिळतात.
किशोरी शहाणेने ही दोन्ही पत्थ्ये व्यवस्थित पाळली आहेत. ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची तिची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी ती आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. ‘पोलिसगिरी’मध्ये तिने प्राची देसाईच्या आईची भूमिका साकारलीय. त्यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून तिचे अगदी व्यवस्थित सुरू आहे. तर मग आणखी हवे तरी काय?
किशोरी शहाणेची घोडदौड
चित्रपटाच्या जगात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काही गोष्टींची अत्यावश्यकता लागते. एक म्हणजे फिटनेस, विविध प्रकारच्या धावपळीतून आपली दमछाक होवू द्यायची नसते आणि दुसरे म्हणजे स्वत:ला सतत बिझी ठेवणे...

First published on: 15-07-2013 at 01:57 IST
TOPICSमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी फिल्मMarathi Filmमराठी सिनेमाMarathi Cinema
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori shahane