‘बिग बॉस’च्या घरात किशोरी शहाणे त्यांच्या जीवनातील दोन सर्वांत महत्त्वपूर्ण व्यक्तींबद्दल बोलताना दिसत आहेत. हे दोन व्यक्ती आहेत दीपक बलराज व बॉबी. वूटवरील ‘अनसीन अनदेखा’च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरीताई आरोह वेलणकरला जॅकी श्रॉफने तिचा जीवनसोबती दीपक बलराजशी कशाप्रकारे भेट घडवून आणली याबाबत सांगताना दिसत आहेत.

किशोरीताई सांगतात, ”दीपक यांनी २२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हफ्ता बंद’मध्‍ये जॅकी श्रॉफ हिरो होता आणि त्यावेळी मी मराठी चित्रपटात काम करत होते. तेव्‍हा जॅकीची आणि माझी ओळख महाकाली, होली स्पिरिट हॉस्पिटलमध्‍ये झाली. त्याठिकाणी तो शूटिंगला यायचा. तेव्हा आमच्याच मैत्री वाढली. तेव्‍हा तो म्‍हणाला की ‘एक डायरेक्‍टर है उनको मराठी अॅक्‍ट्रेस चाहिए’. त्यानंतर जॅकीने माझी ओळख दीपक बलराजशी करून दिली.”

case against Hunter Biden and could he go to ja
वहिनीसोबतचे प्रेमसंबंध, त्यातून घोटाळे; जो बायडेन यांच्या मुलाला शिक्षा; पण तो तुरुंगात जाईल का?
nashik sakal maratha samaj
…अन्यथा शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर उपोषण, नाशिकच्या सकल मराठा समाजाचा इशारा
Sane Guruji Death anniversary Freedom fighter pandharpur mandir pravesh
साने गुरुजी स्मृतिदिन : मातृहृदयी की बंडखोर? ‘रडवे’ साहित्यिक की आग्रही धर्मसुधारक?
lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
Gram Panchayat sarpanch to MLA and now MP Nilesh Lanke is newly elected MP of NCP Sharad Pawar group
ओळख नवीन खासदारांची : नीलेश लंके (नगर-राष्ट्रवादी शरद पवार गट) – अंगी नाना कळा!
Balwant Wankhade, amravati lok sabha seat, Congress new mp Balwant Wankhade, Balwant Wankhade From Sarpanch to MP, From Sarpanch to MP, Balwant Wankhade Defeats BJP s Navneet Rana, sattakaran article, congress,
ओळख नवीन खासदारांची : बळवंत वानखडे (अमरावती – काँग्रेस) ; सरपंच ते खासदारकी…
radhakrishna vikhe patil lose grip after mahayuti defeat in ahmednagar and shirdi seats
राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाला धक्का
This compiled edited part of the introduction to the book Shivarajyabhishek published on the 350th anniversary of Shiva Rajyabhishek
शिवराज्याभिषेकाला लोकमान्यांचे प्राधान्य!

”दीपक यांनी मला ‘हफ्ता बंद’ चित्रपटात भूमिका दिली. सेटवर आमची मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर दीपक यांनी मला ‘बॉम्ब ब्लास्ट’ चित्रपटातही कास्ट केलं. पण तेव्हा आमच्या नात्याबद्दल आईवडिलांना समजलं होतं. त्यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली होती. तेव्हा कुटुंबीयांना खरं काय ते सांगणं भाग होतं. त्यांनीही आमच्या लग्नास होकार दिला,” असं त्या पुढे म्हणाल्या.

किशोरी आणि दीपक बलराज यांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे. बॉबी सध्या मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करत आहे.