सलमान खानने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्याआधी त्याने ऑनस्क्रीन काही छोट्या भूमिका केल्या होत्या. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमानने प्रमुख व्यक्तिरेखा साकारायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले. ‘हम साथ साथ है’, ‘करन अर्जुन’, ‘हम आप के है कौन’ पासून ते ‘सुलतान’, ‘बजरंगी भाईजान’पर्यंनचा प्रवास सलमान खानने केला. बॉलिवूडमधील त्याच्या प्रवासाला २६ ऑगस्टला ३४ वर्ष पूर्ण झाली. या चांगल्या प्रसंगाचे औचित्य साधत सलमानने त्याच्या नव्या चित्रपटातील लूक असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या ३४ वर्षात सलमान खानने त्याचा वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. सलमानचे चाहते त्याला मोठ्या भावाप्रमाणे मानतात. ते त्याला प्रेमाने ‘भाई’ किंवा ‘भाईजान’ म्हणतात. सलमानच्या गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’, ‘राधे – द मोस्ट वॉन्टेड भाई’ अशा काही चित्रपटांमध्येही भाई हा शब्द हमखास आढळतो. सलमानच्या आगामी चित्रपटाचे नाव आधी ‘कभी ईद कभी दिवाली’ असे होते. ते नाव बदलून चित्रपटाचे नाव आता ‘किसी का भाई.. किसी की जान’ असे करण्यात आले आहे. हा बदल खास चाहत्यांसाठी केला असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा-“सर्वांनी सीट बेल्ट…” सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर दिया मिर्झाचे ‘ते’ ट्वीट व्हायरल

२६ ऑगस्टला सलमानने ‘किसी का भाई.. किसी की जान’ चित्रपटातील त्याचा लूक असलेला व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर त्याने या चित्रपटाचा ५९ सेकंदाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. या टीझरमध्ये सलमान खान भल्यामोठ्या बाईकवरुन एंट्री घेतो. आसपासच्या परिसरावरुन तो लदाखमध्ये आहे हे लक्षात येते. जसजसा व्हिडीओ पुढे जातो, तसतसा कॅमेरा त्याच्या चेहऱ्याजवळ येतो. त्याच्या हातातील त्याचे लकी ब्रेसलेट व्हिडीओच्या दुसऱ्या सेकंदाला दिसते. या चित्रपटासाठी सलमानने केस वाढवले आहेत. लदाखमध्ये वाहणाऱ्या वाऱ्यावर त्याचे केस उडत आहेत. त्याने खाकी रंगाचे शर्ट-जीन्स घातली आहे. या टीझरच्या शेवटी चित्रपटाचा नाव समोर येतं.

आणखी वाचा- “तू आता बॉलिवूड वाइफ नाहीस…” सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्याने सीमा सजदेह ट्रोल

काही दिवसांपूर्वी चिरंजीवी-सलमान खान यांच्या ‘गॉडफादर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सलमानचा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. गॉडफादर हा चित्रपट ‘लूसिफर’ या सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.