अभिनेत्री कियारा आडवाणीला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय आणि म्हणूनच येत्या काळात कियारा अनेक सिनेमांमधून झळकणार आहे. नुकतीच कियारा तिच्या टॉपलेस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या फोटोतील कियाराच्या बोल्ड अंदाजाने अनेकांना घायाळ केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा कियारा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी मात्र काही नेटकऱ्यांनी कियाराला ट्रोल केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कियारा तिच्या कोणत्याही बोल्ड फोटोमुळे ट्रोल झाली नसून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलच सुनावलं आहे. कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी गेली होती. यावेळी तिला स्पॉट करण्यात आलं असून या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत कियारा गाडीतून उतरताना दिसतेय. मात्र त्यापूर्वी एक वयोवृद्ध गार्ड कियाराच्या गाडीचं दार उडघून तिला सलाम करताना दिसत आहेत. यामुळेच कियारा ट्रोल झालीय.

हे देखील वाचा: स्तनपानाच्या फोटोनंतर अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो; नेटकरी म्हणाले, “तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती”

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कियारावर संताप व्यक्त केलाय. कियारा गाडीचं दार देखील स्वत: उघडू शकत नाही का? असा सवाल करत कियाराला ट्रोल करण्यात आलंय. एक युजर म्हणाला, “स्वत: एक दरवाजा उघडू शकत नाही. वय पहा त्या व्य़क्तीचं.” तर दुसरा युजर म्हणाला, “निर्लजपणाची हद्द आहे.” आणखी एक युजर म्हणाला, “वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम करून घेतेय.” असं म्हणत नेटकऱ्यांनी कियाराला ट्रोल केलंय.

कियारा आडवाणी लवकरच‘जुग जुग जियों’, ‘भूल भुलैया 2’ या सिनेमांमधून झळकणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा सोबतही ती एका सिनेमात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiyara aadvani trolled as she spotted at sidharth mhalotra house elderly guard open her car door kpw