प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. मृत्युच्या तासाभरापूर्वीच कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वासच बसत नाही. बॉलिवूडसह संपूर्ण संगीत क्षेत्रालाही केकेच्या निधनानंतर धक्का बसला आहे.

केकेच्या निधनानंतर मात्र अभिनेता गायक इम्रान हाश्मी ट्विटरवर ट्रेंड होत आहे. याचं कारण देखील तितकंच खास आहे. केकेच्या आवाजामध्ये एक वेगळीच जादू होती. रोमँटिक गाणी गाण्यामध्ये त्याचा हातखंडच होता. इमरानसाठीच केकेने खूप गाणी गायली आहेत.

आणखी वाचा – गायकीचं शिक्षण न घेताच केके कसा काय ठरला सुप्रसिद्ध गायक?, थक्क करणारा प्रवास

केकेच्या निधनानंतर इमरानचा आवाज देखील हरपला आहे असं बोललं जात आहे. केके आणि इमरान या गायक-अभिनेत्याची जोडी सुपरहिट होती.
चाहते केकेने गायलेली इमरानची गाणी ट्विटरद्वारे शेअर करत गायकाला श्रद्धांजली वाहत आहेत.

आणखी वाचा – VIDEO : ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये फक्त एकच माणूस, व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओक म्हणाला…

केकेने इमरानसाठी बरीच रोमँटिक गाणी गायली. या गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिल इबादत, जरा सा, तू ही मेरी शब है, बिते लम्हे, सोनिये यांसारखी हिंदी रोमँटिक गाणी केकेने इमरानसाठी गायली.

आणखी वाचा – “हा चित्रपटही पाहणार नाही कारण…”, Lal Singh Chaddhaचा ट्रेलर पाहून संतापले लोक

इमरान-केकेची ही गाणी आजही सुपरहिट आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम दिलं. केकेच्या निधनाची बातमी ऐकताच इमरानला देखील फार मोठा धक्का बसला आहे. केकेने हिंदीबरोबरच तमिळ. मल्याळम, बंगाली, गुजराथी भाषेमध्ये गाणी गायली आहेत. केके एका गाण्यासाठी ५ ते ६ लाख रुपये मानधन घेत होता. पण एक उत्तम व्यक्ती आणि कलाकार आपण गमावला याचं बॉलिवूडकरांनाही दुःख होत आहे.

Story img Loader