बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं. ते सतत एकत्र फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या सगळ्यात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत के एल राहुलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अथियाचे वडील म्हणजे अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या सोबत कोणत्या कोणत्या गोष्टीवर बोलत असताना खटके उडतात ते सांगितले आहे.
के एल राहुलने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखती दरम्यान, के एल राहुलने सांगितले की “के एल राहुलने सुनील शेट्टी यांच्या क्रिकेट विषयीच्या मता विषयी सांगितले. सुनील शेट्टी हे क्रिकेटचे मोठे चाहते तर आहेत आणि त्यांना क्रिकेटची चांगली माहितीही आहे. पण कधी कधी के एल राहुल आणि सुनील शेट्टी क्रिकेटवर चर्चा करतात आणि यावेळी वादही होतात”, असे राहुलने यावेळी सांगितले.
पुढे राहुल म्हणाला, “त्यांना क्रिकेट विषयी माहिती असल्यामुळे ते नेहमीच बोलतात की तू फीट नाहीस, तू नीट जेवत नाही आणि म्हणून तुला दुखापत होते. त्यांची जीवनशैली आणि ट्रेनिंग हेल्दी आहे. जर ते वयाच्या ६० व्या वर्षी फीट राहू शकतात तर मी का नाही राहू शकतं हे मला समजलं.