दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. त्यासोबतच तो नेहमी त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलमुळे देखील चर्चेत असतो. चला जाणून घेऊया अल्लू अर्जुनकडे असणाऱ्या सर्वात महागड्या गोष्टींविषयी…

अल्लू अर्जुनकडे स्वत:ची वॅनिटी वॅन आहे. ही वॅन काळ्या रंगाची असून तिच्यावर AA असे लिहिण्यात आले आहे. या वॅनिटी वॅनमध्ये सर्व सुखसुविधा आहेत. अल्लू अर्जुनच्या या वॅनिटीची किंमत जवळपास ७ कोटी रुपये आहे.
PHOTOS: अल्लू अर्जुनचे स्टायलिश घर आतून पाहिलेत का?

वाचा : तिच्या घरी मागणी घालायला गेला अन्…; एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी
अल्लू अर्जुनचा हैदराबादमध्ये आलिशान बंगला आहे. तो मुलांसोबतचे घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. अल्लू अर्जुनच्या घरात थिएटर, मुलांना खेळण्यासाठी वेगळी खोली, पाहुण्यांसाठी वेगळ्या खोल्या, स्विमिंग पूल आहे. त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.

तसेच अल्लू अर्जुनकडे लग्झरी गाड्या देखील आहेत. त्याच्याकडे रेंजरोवर, मर्सिडीज २०० सीडीआय अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. या कार कलेक्शनमध्ये त्याच्याकडे ७५ लाख रुपये किंमत असणारी हमर एच २ देखील आहे. वर्षाला अल्लू अर्जुन जवळपास ३२ कोटी रुपये कमावते असे म्हटले जाते. त्याच्याकडे एकूण ३५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका चित्रपटासाठी तो जवळपास १५ कोटी रुपये मानधन घेतो.

Story img Loader