रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका व्यक्तीला खडेबोल सुनवणारी अनुष्का शर्मा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. एकीकडे रस्त्यावर कचरा करणाऱ्या अरहानला चुक दाखवून अनुष्कानं चांगलं काम केलं असलं तरी तिनं वापरलेली भाषा मात्र असभ्य होती अशी टीका अरहान सिंगनं केली. त्यामुळे अनुष्का – अरहानमधला वाद चांगलाच गाजला. ‘माझ्या चुकीबद्दल मी माफीदेखील मागितली. पण अनुष्का शर्मा कोहली, तेच जर तू नम्रपणे सांगितलं असतंस तर स्टार म्हणून तुझं महत्त्व कमी झालं नसतं. स्वच्छतेच्या जाणीवेसोबतच बोलण्यातही थोडी सभ्यता असायला हवी,’ अशी पोस्ट अरहानने लिहिली होती. त्यानंतर अनुष्कालाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला समोरं जावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा वाद इथेच थांबला नाही तर ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी या दोघांनी माझ्या मुलाचा वापर केला आहे. स्वच्छतेच्या नावाखाली असा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत एखाद्याची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाच नाही.’ असं सांगत अरहानच्या आईनंही अनुष्काला खडे बोल सुनावले. या व्हिडिओमुळे अरहान हे नाव बरंच चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे अरहानचं बॉलिवूडशी  खूपच जूनं नातं आहे.

९० च्या दशकात बालकलाकार म्हणून अरहाननं प्रसिद्धी मिळवली होती. अरहाननं कोणी-ऐकेकाळी बॉलिवूड बादशहा शाहरुख खानसोबतही काम केलं आहे. शहारुखसोबत ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ चित्रपटात अरहाननं काम केलंय. तर माधुरीच्या ‘राजा’ चित्रपटातूनही तो छोट्या पडद्यावर पाहायला मिळाला होता. त्यावेळी अरहानची बॉलिवूडमध्ये ओळख सनी सिंग अशी होती. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पाठशाला’ चित्रपटातही तो दिसला होता. शाहीद कपूरसोबत त्यानं या चित्रपटात कामही केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know more about the man arhhan singh anushka sharma scolded