बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. दीपिका आज तिच्या कुटुंबासोबत ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिका ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाचे लाखो चाहते आहेत. दीपिका नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. चला तर आज दीपिकाच्या पूर्ण संपत्तीविषयी जाणून घेऊया.

दीपिका एका चित्रपटासाठी १५ कोटी ते ३० कोटी रुपये मानधन म्हणून घेते. तर लग्नात डान्स परफॉर्म करायला दीपिका १ कोटी रुपये मानधन म्हणून घेते. तर कोणत्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी दीपिका ७ ते १० कोटी रुपये घेते. दीपिकाच्या प्लॅटिनम अंगठीची किंमत ही १ कोटी ३० लाख ते २ कोटी ७० लाख असल्याचे म्हटले जाते. दीपिकाकडे Mercedes-Maybach S500 गाडी आहे. या गाडीची किंमत ही १ कोटी ८० लाख रुपयांच्या आसपास आहे.

आणखी वाचा : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मलायका झाली बोल्ड, शेअर केला बेडरुममधला व्हिडीओ

या व्यतिरिक्त दीपिकाकडे अनेक महागड्या ब्रँडच्या बॅग आहेत. त्या एकएका बॅगची किंमत ही ७ ते ८ लाख रुपये आहे. दीपिकाचा मुंबईत ४बीएचके फ्लॅट आहे. त्याची किंमत ही १६ कोटी आहे. दीपिकाने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Story img Loader