बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच नुकतचं लग्न झालं आहे. त्या दोघांनी चंदीगढमध्ये लग्न केले आहे. जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. ते दोघे ही आता मुंबईत परतले आहेत. त्या दोघांचे विमानतळावरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

त्या दोघांचे फोटो हे सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेंद्र चावलाने शेअर केले आहेत. या फोटोत पत्रलेखाने लाल रंगाची साडी नेसली आहे. तर राजकुमारने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये चाहत्यांचे लक्ष हे पत्रलेखाच्या मंगळसुत्राने वेधले आहे. पत्रलेखाचे हे मंगळसुत्र लोकप्रिय डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलं आहे. हे मंगळसुत्र १८ कॅरेटचं असून या मंगळसुत्राची किंमत ही १ लाख ६५ हजार असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा : कंगना रणौतच्या ‘भीक’ या वक्तव्यावर जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया

आणखी वाचा : अनुष्का शेट्टीसोबत नागा चैतन्यच्या साखरपुड्याची बातमी ऐकून नागार्जुन यांना बसला होता धक्का

राजकुमार आणि पत्रलेखाने त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटोज शेअर केले आहेत. एवढचं काय तर फोटो शेअर करत रोमँटिक पोस्ट लिहिली होती. तर, राजकुमार आणि पत्रलेखा हे जवळपास ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यावर पोस्ट शेअर करत राजकुमार म्हणाला, “११ वर्षांचं प्रेम, मैत्री आणि उत्तम सहवासानंतर मी माझी सर्व काही, माझी बेस्टफ्रेंड, माझं कुटुंब असणाऱ्या पत्रलेखाशी विवाह केला. पत्रलेखा आज मला तुझा पती म्हणवतानाचा क्षण इतर कुठल्याही क्षणापेक्षा जास्त आनंदाचा वाटत आहे”, असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Story img Loader