बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सोनम कपूरला नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाते. ती नेहमीच बॉलिवूड कलाकारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसते. काही वर्षांपूर्वी अशाप्रकारे एका बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळाले होते. त्यांचा हा किस्सा प्रचंड व्हायरल झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड कलाकारांच्या मैत्रीचे किस्से अनेकदा समोर येतात. तर काहींचे वर्षानुवर्षे सुरु असलेले भांडणचे किस्सेही समोर येत असतात. नुकतंच सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यात एका वादग्रस्त वक्तव्यामुळे शीतयुद्ध रंगले होते. सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यातील हा वाद २००९ मध्ये झाला होता.

ऐश्वर्या राय गेल्या अनेक वर्षांपासून एका प्रसिद्ध ब्युटी ब्रँडशी जोडली गेली होती. पण २००९ मध्ये अचानक या ब्युटी ब्रँडची अॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री सोनम कपूरच्या नावाची घोषणा करण्यात आली. ऐश्वर्या रायला याबाबतची माहिती मिळताच तिने याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यावेळी सोनम कपूरला प्रसारमाध्यमांनी ऐश्वर्या राय बच्चनला ब्रँड अॅम्बेसेडर पदावरुन काढण्याच्या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. त्यावेळी सोनम कपूरने ऐश्वर्या रायला आंटी असे म्हटले होते. ऐश्वर्या ही दुसऱ्या पिढीची आंटी आहे, असे वक्तव्य सोनम कपूरने केले होते.

“ती दुसऱ्या पिढीची आंटी”, ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूर यांच्यातील भांडणाचा ‘तो’ किस्सा माहितीये का?

यानंतर एका मुलाखतीदरम्यान सोनम कपूरला तिच्या या विधानाबद्दल विचारण्यात आले असता तिने स्पष्टीकरण दिले. ऐश्वर्याने माझ्या वडिलांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे मी तिला आंटी म्हटले, असे ती म्हणाली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर काही वर्षांनी सोनम कपूरनेही या सर्व बातम्यांचे खंडन केले होते. यावेळी तिने मी कधीही ऐश्वर्याला आंटी म्हणू शकत नाही. हे सर्व फक्त गॉसिप आहेत, असे सांगत यावर बोलण्यास टाळाटाळ केली होती.

दरम्यान सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघींमध्ये ११ वर्षाचे अंतर आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर ऐश्वर्या रायला सोनम कूपरसोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रॅम्प वॉक करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. जर सोनम माझ्यासोबत स्टेज शेअर करणार असेल तर मी रॅम्पवर चालणार नाही, असे ती म्हणाली होती.

मात्र आता या दोघींमध्येही असलेले शीतयुद्ध मिटल्याचे पाहायला मिळत आहे. त्या दोघीही भूतकाळ विसरल्या आहेत. आता त्या दोघींची खूप चांगली मैत्री झाली आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्याने मे 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नातही हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the reason why sonam kapoor called aishwarya bachchan aunty nrp