अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक महेश मांजरेकर लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत त्यांनी त्यांच्या आगामी ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. काही तासांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा तडफदार सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित आहे. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतंच याचा खुलासा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश मांजरेकर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. “छत्रपतींचा आदेश वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर दौडले सात”, असे म्हणत त्यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित आहे. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देत नेसरी खिंड पावन केली. ही सर्व लढाई या चित्रपटात दाखवली जाणार आहे.

“छत्रपतींचा आदेश वाहे सळसळत्या रक्तात…”, महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

तडफदार सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेत स्वत: महेश मांजरेकर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र इतर कोणत्याही कलाकाराचा चेहरा अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसेच यात इतर सहा शिलेदार कोण याबाबत गुप्तता पाळली जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि बहलोल खान कोण साकारणार याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

“न भूतो न भविष्यती, मराठीतील सर्वाधिक बजेटची कलाकृती…”, महेश मांजरेकरांकडून ‘महाराष्ट्र दिनी’ नव्या चित्रपटाची घोषणा

येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे सध्या छत्रपती शिवरायांवर निर्मिती होत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये या चित्रपटाचीही भर पडणार आहे. या आधी महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know these actor will be seen in the role of veer daudale saat marathi movie based on sarsenapati prataprao gujar nrp