दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. त्याने लोकांचे मनोरंजन करण्याच्या कसबीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रजनीकांत याच्या अशा १० दुर्मिळ गोष्टींची माहिती दिली आहे, ज्या तुम्हाला नक्कीच माहिती करून घ्यायला आवडतील.
१. रजनीकांत यांनी ‘भाग्य देबता’ या बंगाली चित्रपटाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
२. आशिया खंडात जॅकी चॅननंतर सर्वाधिक मानधन घेणारे ते दुसरे अभिनेता आहेत.
३. ते एकमेव अभिनेता आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला आहे.
४. त्यांची अनेकजण पूजा करत असले तरी हा दिग्गज अभिनेता मात्र कमल हसन यांचा चाहता आहे.
५. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा त्यांना सुपरस्टार रजनीकांत असे श्रेय देण्यास भाग पाडतो.
६. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते.
७. आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टीस करत असत.
८. रजनीकांत केवळ पाच वर्षांचे असताना त्यांनी आपल्या आईला गमावले.
९. बॉक्स ऑफीसवर आपला एखादा चित्रपट पडल्यानंतर त्यातला तोटादेखील सहन करणारे रजनीकांत हे एकमेव अभिनेता असल्याचे म्हटले जाते.
१०. रजनीकांत यांना पद्म पुरस्कानेही नावाजण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kochadaiiyaan releases today 10 lesser known facts of rajinikanth