रजनीकांत आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कोचादैयान’ हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे.
तमिल, तेलगू, हिंदी, पंजाबी, भोजपुरी आणि मराठी या सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. एकाच वेळी सहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचीही जोरदार तयारी सुरू आहे. या महिन्याच्या तिस-या आठवड्यात हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठविण्यात येईल. चित्रपटाचे ऑडिओ आणि ट्रेलर ९ मार्चला चेन्नई येथे एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात येणार असून, उन्हाळ्यात ‘कोचादैयान’ प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2014 रोजी प्रकाशित
सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार ‘कोचादैयान’
रजनीकांत आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कोचादैयान' हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

First published on: 03-03-2014 at 03:28 IST
TOPICSदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment NewsरजनीकांतRajinikanth
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kochadaiyaan to be released in six languages