रजनीकांत आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कोचादैयान’ हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे.
तमिल, तेलगू, हिंदी, पंजाबी, भोजपुरी आणि मराठी या सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. एकाच वेळी सहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचीही जोरदार तयारी सुरू आहे. या महिन्याच्या तिस-या आठवड्यात हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठविण्यात येईल. चित्रपटाचे ऑडिओ आणि ट्रेलर ९ मार्चला चेन्नई येथे एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात येणार असून, उन्हाळ्यात ‘कोचादैयान’ प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा