बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ७’ हा शो चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना करण या शोमध्ये बोलतं करत असतो. नुकतंच शोमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने हजेरी लावली. गौरीसह तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने शोमध्ये सहभाग घेतला. शोमध्ये करणने विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना तिघींनीही अगदी गमतीशीर उत्तरे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये महीप कपूरने बॉलिवूडमधील लोकप्रिय रणवीर-दीपिका, विकी-कतरिना, रणबीर-आलिया या जोडींना सल्ला दिला आहे. करणने महीप कपूरला रणवीर सिंह-दीपिका पदुकोणला लग्नानंतर कोणता सल्ला देशील असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत ती “त्यांना सल्ला देणारी मी कोण आहे? पण तरीही मी त्यांना चांगलं सेक्स करण्याचा आणि त्याबरोबरच कपडे शेअर न करण्याचा सल्ला देईन”, असं ती म्हणाली.

हेही वाचा >> सोनम कपूरने लाडक्या लेकासाठी सजवली रूम, खास फोटो पाहिलात का?

हेही वाचा >> Koffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”

करणने महीपला बॉलिवूडमधील प्रसिद्ध नवविवाहित विकी कौशल आणि कतरिना कैफ जोडीला सल्ला देण्यास सांगितले. यावरही महीप कपूरने सेक्स असंच उत्तर दिलं. ती म्हणाली “चांगलं सेक्स, चांगलं सेक्स आणि चांगलं सेक्स. विकीकडे कतरिना आहे. त्यामुळे त्यांचं सगळं काही नीटच सुरू असेल”. त्यानंतर करणने महीपला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीला सल्ला देण्याबाबत प्रश्न विचारला.

हेही वाचा >> प्रकाश राज यांनी दत्तक घेतलेल्या गावाचे फोटो तेलंगणातील शहरी विकासमंत्र्यांनी केले शेअर, म्हणाले “हे गाव…”

आलिया-रणबीरला सल्ला देताना महीप म्हणाली “लग्नानंतर चांगलं सेक्स करा आणि त्याबरोबरच होणाऱ्या बाळाची दोघांनीही समानतेने जबाबदारी घ्या”. बॉलिवूडमधील आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी एप्रिल महिन्यात विवाहबंधनात अडकली. आता लवकरच ते आई-बाबा होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffe with karan 7 maheep kapoor advise ranbir kapoor alia bhatt says good sex after marriage and share baby duties kak