दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ शोचं (Koffee with Karan 7) सातवं पर्व सुरु झालं आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे यांसारख्या कलाकारांनी या नव्या पर्वामध्ये आतापर्यंत हजेरी लावली. कलाकारांचे चित्रपट ते त्यांचं खासगी आयुष्य यामुळे हा शो अधिक चर्चेत असतो. आता या पर्वाच्या नव्या भागामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हजेरी लावली होती.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, “…यामागे आमिर खानच”

यावेळी करणने या दोघांना खासगी तसेच चित्रपटांबाबत अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबरीने रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटबाबत विचारण्यास करण विसरला नाही. रणवीरच्या न्यूड फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या या लूकवर अनेक कलाकार मंडळींनी आपलं मत व्यक्त केलं. आता आमिरने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

करण आमिरला विचारतो तू रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट पाहिलंस का? या प्रश्नावर तो उत्तर देतो की, “हो. मी त्याचे न्यूड फोटोशूट पाहिलं आहे. रणवीरची शरीरयष्टी अगदी उत्तम आहे. मला असं वाटतं त्याचा हा लूक थोडा बोल्ड होता.” रणवीरच्या या फोटोशूटला इतर कलाकारांबरोबरच आमिरने देखील पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा – Koffee With Karan 7 : “मुलं झाल्यानंतर सेक्स लाइफ बदलतं का?” करीना-आमिरचं उत्तर ऐकून करण जोहरची बोलती बंद

आमिर-करीना सध्या त्यांच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉयकॉट लाल सिंह चड्ढा हा ट्रेंड सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

Story img Loader