सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमुळे चर्चेत आहे. या लोकप्रिय शोमध्ये अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावताना दिसतात. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींना या शोमध्ये खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात. ‘कॉफी विथ करण’चा (Koffee With Karan 7) हा ७वा सीझन आहे. या सीझनमधील जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सारा अली खानचा (Sara Ali Khan) एपिसोड तर प्रचंड गाजला. पण या एपिसोडमुळे करण जोहर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

‘कॉफी विथ करण ७’मधील जान्हवी आणि साराचा एपिसोड लोकप्रिय ठरला. या एपिसोडमध्ये जान्हवी-सारासाठी एक खास सेगमेंट ठेवण्यात आलं होतं. यामध्ये दोघींनाही एखादा चित्रपट कोणता आहे? हे ओळखायचं होतं. एपिसोडसाठी वापरण्यात आलेल्या विविध कल्पना या माझ्या होत्या असं लेखिका-पत्रकार मान्या आहूजाचं म्हणणं आहे.

मान्याने एक ट्विट करत करण जोहरवर आरोप केला आहे. करणने ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट ओळखता यावा यासाठी सारा-जान्हवीसमोर वेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं. “एक मोठी व्यक्ती जिला पायातील बुटांची लेस बांधता येत नाही. ती व्यक्ती चुकून आपल्या आधीच्या आजीला स्वतःची ओळख सांगते.” हाच व्हिडीओ ट्विट करत मान्याने म्हटलं की, “मी iDivaसाठी जो लेख लिहिला त्याचा पूर्ण वापर या एपिसोडसाठी करण्यात आला. मला ही संकल्पना सुचली होती आणि लिहिताना मजा येत होती म्हणून मी लेख लिहिला. पण यासाठी मला श्रेय मिळू नये हे खरंच मान्य नाही.”

आणखी वाचा – कोणत्या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या जान्हवी-सारा? करण जोहरचा मोठा खुलासा

२०२०मध्ये iDiva साठी लिहिलेला तो लेख मान्याने ट्विटरद्वारे शेअर केला आहे. या लेखामध्ये करण ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाबाबत करण जे बोलला ते तसंच लिहिण्यात आलेलं आहे. ‘कॉलिंग ऑल बॉलीवुड बफ्स: गेस द मूवी विद इन’ असं या लेखाचं नाव आहे. आता करण या ट्विटला काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffee with karan 7 accused of plagiarism writer said karan johar did not give credit for the show segment see details kmd
Show comments