बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती. या आधी अनन्या पांडे मागच्या काही काळापासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे मागच्या काही काळापासून आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. करण जोहरच्या शोमध्ये अखेर या सर्व चर्चांवर अनन्याने मौन सोडलं आहे. अनन्याने तिच्या लव्ह लाइफबद्दल बिनधास्त गप्पा मारल्या आणि आदित्यसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे.

करण जोहरच्या शोमध्ये कलाकार आपले खासगी आयुष्य, प्रेम आणि जवळच्या मित्रांशी संबंधीत खुलासे करताना दिसतात. विशेषतः करणच्या शोमध्ये अनेकदा खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे होतात. ७ व्या सीझनमध्येही आतापर्यंत अक्षय कुमार, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि समंथा सारख्या कलाकारांनी हजेरी लावली आहे आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

अनन्या पांडेनं या शोमध्ये अभिनेता विजय देवरकोंडासोबत हजेरी लावली होती. दोघंही ‘लायगर’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. करण जोहरच्या शोमध्ये अनन्याने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करतानाच आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. अनन्याने या शोमध्ये तिच्या लव्ह लाइफबद्दल बोलताना ती सिंगल असल्याचंही कबूल केलं.

आणखी वाचा- इशान खट्टरशी ब्रेकअपनंतर अनन्या पांडे करतेय आदित्य रॉय कपूरला डेट? चर्चांना उधाण

अनन्या म्हणाली, “मी या प्लानेटवर सर्वात अविवेकी मुलगी आहे. मला आदित्य रॉय कपूर हॉट वाटतो आणि तो माझा क्रश आहे.” याशिवाय इशान खट्टरसोबतच्या ब्रेकअपबद्दल विचारल्यावर ती, “मला माझ्या भूतकाळात जगायला आवडत नाही. त्यामुळे मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.” असं म्हणाली. दरम्यान अनन्याच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच विजय देवरकोंडासोबत ‘लायगर’ चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader