गेल्या काही दिवसांपासून करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ७’ हा शो सोशल मीडियावर चर्चेत आहे. आतापर्यंत आलिया भट्ट आणि रणवीर सिंगपासून ते जान्हवी कपूर, अक्षय कुमार, आमिर खान, करीना कपूर खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी मंडळींनी करणच्या ‘कॉफी विथ करण ७’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. अभिनेते अनिल कपूर आणि वरुण धवन या शोमध्ये उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत ‘या’ अभिनेत्यासह प्राजक्ता माळी लंडनला रवाना, म्हणाली, “माझ्या मित्राबरोबर…”

करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘कॉफी विथ करण ७’चा नवा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अनिल आणि वरुण मजा-मस्ती करताना दिसत आहेत. तसेच करण या दोघांनाही त्यांच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारताना दिसत आहे. अनिल कपूर यांच्या एका उत्तरामुळे हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ

“कोणत्या तीन गोष्टींमुळे तुम्ही अधिक तरुण दिसता?” असा प्रश्न करण या प्रोमोमध्ये अनिल यांना विचारताना दिसत आहे. यावर अनिल म्हणतात, “सेक्स, सेक्स, सेक्स.” अनिल कपूर यांचं हे उत्तर ऐकून करण आणि वरुणलाही हसू अनावर होत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच वरुण-करण हसल्यानंतर “हे सगळं काही स्क्रिप्टेड आहे.” असं देखील अनिल बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय?” शरद पोंक्षे म्हणतात…

‘कॉफी विथ करण ७’च्या या नव्या प्रोमोला नेटकऱ्यांनी अधिकाधिक पसंती दिली आहे. या नव्या भागासाठी आम्ही उत्सुक असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. अनिल कपूर वयाच्या ६५व्या वर्षी देखील तितकेच तरुण दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांचा फिटनेस तरुण अभिनेत्यांनाही लाजवणारा आहे. आता ‘कॉफी विथ करण ७’च्या नव्या भागामध्ये ते त्यांच्या खासगी आयुष्याबाबत कोणत्या नव्या गोष्टींचा उलडगडा करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Story img Loader