बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा नेहमी त्याच्या लक्षवेधी कपड्यांसाठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून रणवीर हा सातत्याने चर्चेत आहे. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याच्या या फोटोशूटमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्याचे हे फोटो पाहून अनेकजण त्याला ट्रोल करत आहे. तर काही जण त्याचे समर्थन करताना दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. नुकतंच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ व्या पर्वात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सहभागी झाला होता. यावेळी त्याला या प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमुळे चर्चेत आहे. या लोकप्रिय शोमध्ये अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावताना दिसतात. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींना या शोमध्ये खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात. ‘कॉफी विथ करण’चे ७ वे पर्व हे सध्या गाजताना दिसत आहे. नुकतंच या कार्यक्रमात अभिनेता विजय देवरकोंडाने अभिनेत्री अनन्या पांडेसोबत हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

रश्मिकासोबतच्या नात्यावर विजय देवरकोंडाचा मोठा खुलासा, म्हणाला “ती माझ्यासाठी…”

करण जोहरच्या या कार्यक्रमात विजय देवरकोंडासोबत रॅपिड फायरही खेळण्यात आले. यावेळी करणने विजय देवरकोंडाला रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरुन एक प्रश्न विचारला. ‘तू एखाद्या आंतरराष्ट्रीय मासिकासाठी न्यूड फोटोशूट करशील का?’ असा प्रश्न तिला करणने विचारला होता. त्यावर त्याने हटके उत्तर दिले. “जर ते न्यूड फोटोशूट चांगल्या रितीने शूट झाले तर मला ते करण्यास काहीही हरकत नसेल”, असे विजय देवरकोंडाने म्हटले.

दरम्यान रणवीरने शनिवारी २३ जुलै रोजी सोशल मीडियावर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले. या फोटोतील काही फोटोत रणवीरच्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे दिसले. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले होते. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसला. यात त्याने बोल्ड पोजही दिल्या होत्या. रणवीर सिंगने केलेले हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी केले होते. त्याच्या या फोटोवरुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर काहींनी त्याचे समर्थनही केले. यानंतर प्रचंड गदारोळ सुरु झाला.

विश्लेषण : न्यूड फोटोशूटबद्दल शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? जाणून घ्या

याप्रकरणी रणवीर सिंगच्या विरोधात दोन ठिकाणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेने आणि ठाण्यातील एक वकील वेदिका चौबे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी रणवीर सिंहविरोधात अश्लीलता पसरवल्या प्रकरणी कलमांखाली गुन्ह्याची नोंद केली. रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Story img Loader