दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) शोला प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. आजवर या शोचे सहा सीझन प्रदर्शित झाले. आता ‘कॉफी विथ करण’च्या ७व्या सीझनला सुरुवात झाली आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा या सीझनमधील एपिसोड प्रचंड गाजला. त्यानंतर जान्हवी कपूर (Janhvi kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) या स्टारकिड जोडीने शोमध्ये हजेरी लावली. यावेळी दोघींनाही करणने त्यांच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले.

आणखी वाचा – रोहमन आणि ललित मोदी यांना एकत्रच डेट करत होती सुष्मिता? एक्स बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालं अन्…

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Bigg Boss 18 chahat pandey talks about boyfriend with kashish Kapoor watch video
Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

कलाकारांचं खासगी आयुष्य, रिलेशनशिप याबाबत ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये बोललं जातं. जान्हवी-साराने देखील आपल्या खासगी आयुष्याबाबत ‘कॉफी विथ करण’च्या एपिसोडमध्ये अनेक खुलासे केले. पण करणनेही या दोघींबाबत एक मोठा खुलासा केला आहे. हे ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सारा-जान्हवी अगदी जीवलग मैत्रिणी आहेत. बऱ्याचदा दोघीही एकत्र वॅकेशन एण्जॉय करताना दिसतात. ‘कॉफी विथ करण’मध्ये याबाबतच बोलणं सुरु असताना करणने म्हटलं की, “आता तुमच्या दोघींची मैत्री कितपत आहे याची मला कल्पना नाही. कोविड काळाच्या आधीची ही गोष्ट आहे. तुम्ही दोघींनी दोन सख्ख्या भावांना डेट केलं आहे. ते दोन्ही भाऊ माझ्याच इमारतीमध्ये राहत होते. या दोन सख्ख्या भावांमुळेच आपल्या तिघांमध्ये मैत्री वाढली आहे.”

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील शेखरच्या पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष, म्हणाला, “५ वर्ष वाट पाहिली पण…”

आता जान्हवी-सारा यांनी कोणत्या दोन सख्ख्या भावांना डेट केलं? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. जान्हवी-सारा वीर आणि शिखर पहाडिया या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या. वीर-शिखर यांचं कुटुंब राजकारणाशी देखील जोडलं गेलेलं आहे. वीरचं वय २८ वर्ष असून दुबईमध्ये तो सध्या शिक्षण घेत आहे. तर २३ वर्षीय शिखर लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेला आहे.

Story img Loader