बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एवढी सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या कियाराच्या नावाची चर्चा आता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमुळे होताना दिसत आहे. कियारा आडवाणीने नुकतीच अभिनेता शाहिद कपूरसह करणच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहे. पण यासोबतच करण जोहरने कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्याची सोशल मीडियावर सातत्याने चर्चा आहे. नुकतंच कियाराने या शोमध्ये त्यांच्या या नात्याबाबत बरेच खुलासे केले. सिद्धार्थ मल्होत्रा आपल्यासाठी बेस्ट फ्रेंडपेक्षा जास्त काहीतरी आहे अशी कबुली कियाराने या शोमध्ये दिली. याचवेळी करण जोहरने सिद्धार्थ आणि कियाराच्या पहिल्या भेटीबाबत खुलासा केला.
आणखी वाचा-करण जोहरने कियारा आडवाणीला विचारला सिद्धार्थ मल्होत्राबद्दल प्रश्न, उत्तर देताना म्हणाली “मला लग्न…”
कियारा आणि सिद्धार्थ यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण या चित्रपटात काम करण्याआधीपासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते. या दोघांची पहिली भेट करण जोहरच्या एका पार्टीमध्ये झाली होती. ‘कॉफी विथ करण’मध्ये या भेटीबद्दल स्वतः करण जोहरनेच सांगितलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी ‘लस्ट स्टोरीज’च्या रॅप पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी करण जोहरही त्यांच्यासोबत होता.
दरम्यान ‘कॉफी विथ करण’च्या या भागात करण जोहरला सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खुलासा करताना ती म्हणाली, “सिद्धार्थ हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे.” यानंतर तिला लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताच ती म्हणाली, “माझा लग्नावर पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या आजूबाजूला अनेक छान छान विवाहसोहळे पाहिले आहेत. त्यामुळे मलाही माझ्या आयुष्यात ते घडताना पाहायचे आहे. पण हे कधी होईल हे मला सांगता येणार नाही.”
आणखी वाचा- मिलिंद सोमणने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, फोटो शेअर करत म्हणाला…
करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट-रणवीर सिंह, जान्हवी कपूर-सारा अली खान, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे, आमिर खान-करीना कपूर यांच्यासह सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली आहे.