अभिनेत्री सारा अली खान बहुचर्चित स्टारकिडपैकी एक आहे. सारा आपल्या खासगी आयुष्याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. अभिनेता कार्तिक आर्यन आपल्याला आवडत असल्याचं तिने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानंतर सारा-कार्तिकच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं जात होतं. आता सारा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.

आणखी वाचा – Photos : छोट्या पडद्यावरील सर्वात सुपरहॉट अभिनेत्रीचं मुंबईमध्ये अलिशान घर, पाहा फोटो

Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

‘कॉफी विथ करण’च्या ७व्या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये सारा आणि जान्हवी कपूर दिसत आहे. सारा-जान्हवीचा हा एपिसोड रंगतदार होणार हे या प्रोमोमधूनच लक्षात येतं. करण या प्रोमोमध्ये दोघींनाही त्यांच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारताना दिसत आहेत. अशामध्ये तो साराला एक प्रश्न विचारतो.

पाहा व्हिडीओ

“सिनेसृष्टीमधील कोणत्या व्यक्तीला डेट करण्याची तुझी इच्छा आहे? त्या व्यक्तीचं नाव सांग” असं करण साराला विचारतो. यावेळी सारा चक्क दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचं नाव घेते. साराचं हे उत्तर ऐकून जान्हवी कपूरला हासू आवरत नाही. आता कार्तिक नव्हे तर विजय देवरकोंडाच्या प्रेमामध्ये सारा आहे.

आणखी वाचा – “माझ्या पतीसह आम्ही सगळेच नशेमध्ये होतो अन्…”; राधिका आपटेनेच सांगितलं स्वतःच्या लग्नात नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे साराचं हे उत्तर ऐकून विजने देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, “तू ज्यापद्धतीने देवरकोंडा म्हटलंस मला खूप आवडलं. खूप सारं प्रेम.” विजय देवरकोंडाचा ‘लीगर’ चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरील त्याचा न्यूड लूक तर प्रचंड गाजला. या चित्रपटाच्यानिमित्ताने त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Story img Loader