दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तर मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. पण बॉलिवूडमध्ये मात्र यावर वेगळ्याच चर्चा सुरू आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या चर्चांवर मोठा खुलासा केला.
करण जोहरच्या चॅटशोमध्ये सारा आणि जान्हवी यांनी अनेकदा विजय देवरकोंडाचं नाव घेतलं. त्यावरून या दोघीही साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडावर फिदा आहेत. जेव्हा करण जोहरने सारा अली खानला अशा एका व्यक्तीचं नाव सांग ज्याला डेट करण्याची तुझी इच्छा आहे असं विचारलं. त्यावर सारा अली खाननं विजय देवरकोंडाचं नाव घेतलं. यानंतर जेव्हा साराने जेव्हा जान्हवीला विचारलं की तिलाही विजय आवडतो का तर त्यावर जान्हवीही विजयला डेट करण्यास तयार असल्याचं म्हटलं.
या एपिसोडमध्ये जान्हवीने विजयचा संदर्भ देत म्हटलं की, त्याच्यामुळेच रश्मिका मंदानाच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये वाढ झाली. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा विजय आणि रश्मिकाच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नाही तर सारा आणि जान्हवीने अप्रत्यक्षपणे विजय आणि रश्मिकाच्या नात्याची पुष्टी केल्याचं बोललं जात आहे. विशेषने विजय देवरकोंडाने या एपिसोडमधील एका भाग आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना सारानं त्याचं नाव क्यूट पद्धतीने घेतल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला होता.
आणखी वाचा- कोणत्या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या जान्हवी-सारा? करण जोहरचा मोठा खुलासा
दरम्यन विजय देवरकोंडाच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच पुरी जगन्नाथ यांच्या ‘लाइगर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडेची मुख्य भूमिका आहे. याशिवाय तो शिवा निर्वाणच्या ‘खुशी’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिका आहे. तर रश्मिकाकडे ‘गुडबाय’, ‘मिशन मजनू’ आणि ‘एनिमल’ हे बॉलिवूड चित्रपट आहेत.