‘कॉफी विथ करण ७’च्या नव्या भागामध्ये किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खानने हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले. पती शाहरुख खान आणि आपल्या मुलांबाबतच्या काही गोष्टी तिने या शोमध्ये सांगितल्या. पण लेक सुहाना खाननेही आपल्या आईबाबात काही गोष्टी सगळ्यांबरोबर शेअर केल्या. या शोसाठी सुहानाने आपला आवाज रेकॉर्ड करून पाठवला होता. यावेळी ती आई आपल्याशी कशी वागते? ती इतर सामान्य स्त्रियांप्रमाणेच आहे का? याबाबत सुहानाने सांगितलं.

काय म्हणाली सुहाना खान?

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

“माझ्या आईला सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. पण एखादी गोष्ट जर तिला समजली तर ती तिच्या मित्र मंडळींना सांगते. म्हणजेच माझं एखादं कोणतं गुपित असेल तर ते गुपित असं राहतच नाही. एखादी गोष्ट कोणालाच सांगायची नाही हे तिला ५०० वेळा जरी सांगितलं तरी ती सगळ्यांना सांगते. माझी आईदेखील इतर आईंप्रमाणेच आहे.” असं सुहानाने यावेळी सांगितलं.

पुढे ती म्हणाली, “जेव्हा आई वॅकेशनसाठी जाते तेव्हा तिला कोणाशीच बोलायला आवडत नाही. आई लंडनमध्ये जाते तेव्हा तिला एखाद्या व्यक्तीने कोणता पत्ता जरी विचारला तरी ती त्याला इंग्रजी भाषेमध्ये उत्तर देत नाही. कारण सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये तिला बोलायला आवडत नाही.” त्याचबरोबरीने सुहानाने आईबाबत एक सीक्रेट सांगितलं आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या बायकोचा लेकाला रिलेशनशिपबाबत विचित्र सल्ला, म्हणाली, “लग्नापूर्वी पाहिजे तितक्या मुलींना…”

गौरी खान ब्रिटीश एअरवेज किंवा जेट एअरवेजमध्ये मिळालेला पायजमा आपल्या कपाटामध्ये ठेवते. इतकंच नव्हे तर घरीदेखील हा पायजमा ती घालते. खासकरून रात्री झोपताना तिला अशाप्रकारचे कपडे परिधान करणं आवडतं. गौरीचं हे सीक्रेट ऐकून करणदेखील आश्चर्यचकित झाला.

Story img Loader