‘कॉफी विथ करण ७’ शोच्या नव्या भागामध्ये प्रेक्षकांना नवं काहीतरी अनुभवायला मिळणार आहे. या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणारा भाग काही खास असणार आहे. विनोदी कलाकार तन्मय भट्ट, दानिश सैत, युट्युबर कुशा कपिला व निहारिका एनएम हजेरी लावणार आहेत. या नव्या भागाचा प्रोमो करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मंचावर उपस्थित असणारी सगळीच मंडळी करणला विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Video : …अन् शोकसभेदरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “आयुष्यच संपलं…”

तन्मय, दानिश, कुशा आणि निहारिका करणला त्याच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारताना दिसणार आहेत. तसेच या नव्या प्रोमोमध्ये करणची बोलती बंद झाली असल्याचं दिसत आहे. ‘कॉफी विथ करण ७’च्या गेल्या भागामध्ये करणने पहिल्यांदाच त्याच्या नात्याबाबत खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिपबाबत चर्चा होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

तुझा एक्स कोण होता?, ती व्यक्ती सुप्रसिद्ध आहे का?, त्या व्यक्तीला आम्ही ओळखतो का? असा प्रश्न या शोमध्ये उपस्थित असणारे करणला विचारतात. वरुण धवनला तुझ्या नात्याबाबत माहित होतं. मग तू डेविड धवन यांना डेट करत होतास का? असा प्रश्न या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारी मंडळी करणला विचारतात.

आणखी वाचा – Video : मराठमोळ्या व्यक्तीच्या घरी जावून करिश्मा-करीनाने झुणका भाकरीवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल

करण या प्रश्नावर अगदी हसत उत्तर देतो की, “मी कधीच डेविड धवन यांना डेट केलं नाही.” इतकंच नव्हे तर आलिया भट्टचीही खिल्ली उडवण्यात आली असल्याचं या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर साकारत असलेल्या शिवा या पात्राला ती ज्याप्रकारे हाक मारते याबाबत तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे.