बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. कियारा आडवाणीशी असलेल्या त्याच्या नात्यामुळे तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनीही त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. पण यावेळी सिद्धार्थने शरीरसंबंधांबाबत केलेलं एक वक्तव्य बरंच चर्चेत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने या शोमध्ये त्याच्या आणि कियारा आडवाणीच्या नात्याबाबत हिंट तर दिलीच पण प्रेम आणि शरीरसंबंध या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशाप्रकारे एकमेकांत गुंतलेल्या आहेत यावरही भाष्य केलं. या एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या हटके पंजाबी स्टाइलमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
आणखी वाचा- “…तर भारताचा अपमान होईल” कॅनडाच्या दिग्दर्शकाचं ‘द कश्मीर फाईल्स’बाबत वक्तव्य चर्चेत

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार

करण जोहरने या शोमधील एका सेशनमध्ये विकी कौशलसाठी नेटिजन्स काय कमेंट्स करतात हे वाचून दाखवलं. एका युजरनं विकी कौशलवर कमेंट करताना लिहिलं होतं, “विकी कौशलमध्ये एवढी एनर्जी आहे की कतरिनाला दिलासा देणाऱ्या कोणत्याच व्यक्तीची गरज पडणार नाही.” यावर विकीने लगेचच, “ही कमेंट मला आवडली” असं उत्तर दिलं.

आणखी वाचा- “कियारा आडवाणीशी लग्न करण्याचा काय प्लान?” करणच्या प्रश्नावर सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो…

करण जोहर त्याच्या शोमध्ये येणाऱ्या सर्वच पाहुण्यांना त्यांच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावेळी त्याने विकी कौशलला आणखी एक कमेंट वाचून दाखवली. ती अशी होती की, “विकी कौशल इतर अभिनेत्यांच्या तुलनेत कमी सेक्शुअल आहे.” करणच्या या कमेंटवर सिद्धार्थने लगेच प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “सेक्शुअल होण्यासाठी प्रेमदेखील गरजेचं आहे. प्रेम नसेल तर सेक्स करणं म्हणजे प्रामाणिक नसल्यासारखं आहे.” सिद्धार्थच्या या वक्तव्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याचं कौतुक होताना दिसत आहे.

Story img Loader