करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’ च्या सातव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये पंजाबी बॉइज सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विकी कौशल यांनी हजेरी लावली. या शोमध्ये एककीडे कतरिना कैफवरून विकी कौशलची करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जोरदार खिल्ली उडवली. तर दुसरीकडे करणने सिद्धार्थ मल्होत्रालाही त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले.

विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करण जोहरच्या चॅट शोमध्ये वैयक्तिक जीवनाबद्दल बरेच खुलासे केले. एपिसोडच्या सुरुवातीला, करण जोहर या शोमुळे विकीचं आयुष्य कसं बदललं याबद्दल सांगितलं. करण जोहरच्या चॅट शोमध्ये कतरिना कैफने, तिला विकी कौशलसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा विकीला हे कळाले तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. विकी आणि कतरिनानं २०२१ मध्ये लग्नही केलं. यावरूनच सिद्धार्थ मल्होत्रा विक्की कौशलला चिडवताना दिसला.
आणखी वाचा- KBC 14 : अमिताभ बच्चन यांच्यासमोर ‘तो’ थेट गर्लफ्रेंडलाच घेऊन आला अन्…

करणने सिद्धार्थ मल्होत्राला त्याची कथित गर्लफ्रेंड कियारा अडवाणीबद्दल प्रश्न विचारला. या शोमध्ये लोकांनी केलेल्या घोषणा कशा यशस्वी झाल्या हे सांगत असतानाच तो कियारासोबत लग्नाच्या प्लानबद्दल प्रश्न विचारतो, “कियारा आडवणीशी लग्न करण्याचा काही प्लान आहे का?” यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, “मी आनंदी आणि उज्ज्वल भविष्याची घोषणा करतो.” या व्हिडीओनंतर आता करणच्या शोमध्ये सिद्धार्थ कियाराशी लग्न करणार असल्याची घोषणा करणार आहे का? याची चाहत्यांनी उत्सुकता आहे.

आणखी वाचा- ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’मुळे करण जोहर चिंतेत? म्हणाला, “९ सप्टेंबरला काय होईल हे याक्षणी…”

दरम्यान करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट-रणवीर सिंह, जान्हवी कपूर-सारा अली खान, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे, आमिर खान-करीना कपूर यांच्यासह सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली आहे.

Story img Loader