‘कॉफी विथ करण’ हा टॉक शो २००४ साली सुरू झाला होता. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या या कार्यक्रमाचा सातवा सीझन जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. आतापर्यंत या शोचे ८ भाग प्रसारित झाला आहेत. ‘कॉफी विथ करण’च्या या सीझनमध्ये आलिया भट-रणवीर सिंग, अक्षय कुमार-समांथा, आमिर खान-करीना कपूर असे बरेचसे कलाकार उपस्थित राहिले होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी हजर राहिले होते. नुकताच कॉफी विथ करणच्या ९ व्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

कॉफी विथ करणच्या ९ व्या भागाच्या प्रोमो व्हिडीओमध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉन टायगर श्रॉफसह या भागात सहभागी झाल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण भागातील काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या कार्यक्रमामध्ये क्रितीने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट चित्रपटासाठी ऑडिशन दिल्याचे कबूल केले. टायगर आणि क्रितीने ‘हिरोपंती’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा ‘हिरोपंतीच्या आधी तू अनेक ऑडिशन्स दिल्या असशील ना…’ या करणच्या प्रश्नाला उत्तर देताना क्रितीने, ‘मी स्टुडंट ऑफ द इयर १ साठी ऑडिशन दिली होती.’ असं उत्तर दिलं. यावर करणने ‘उप्स’ अशी प्रतिक्रिया दिली.

पुढे करणने टायगरला ‘तुला रणवीर सिंगच्या कोणत्या गोष्टीचा हेवा वाटतो ?’ असा प्रश्न केला. त्यावर टायगरने ‘त्याची पत्नी दीपिका’ असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने दीपिका खूप प्रतिभाशाली असल्यामुळे मला रणवीरचा हेवा वाटतो असे स्पष्टीकरण दिले. ‘हिरोपंती’नंतर तब्बल ८ वर्षांनंतर टायगर आणि क्रिती एकत्र काम करणार आहेत. त्यांचा चित्रपट ‘गणपत’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे. कॉफी विथ करन कार्यक्रमात करण जोहरने क्रितीला ‘तू टायगरला डेट करशील का ?’ असे विचारले. त्यावर क्रिती हसत ‘मी टायगरला डेट करणार नाही. सतत उड्या मारत असतो.’ असे म्हणाली. कॉफी विथ करण सीझन सातचा ९ वा भाग येत्या गुरुवारी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader