दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी नुकतीच करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती. या दोघांचा ‘लायगर’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत आणि त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या आणि विजय देवरकोंडा यांनी करणच्या चॅटशोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये करणने विजयचं रिलेशनशिप स्टेटस जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र विजयने हटके उत्तरं देत करण आणि अनन्यालाही गोंधळात टाकलं. पण या शोमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत मात्र बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

करण जोहरच्या शोमध्ये विजय देवरकोंडानं त्याचं खासगी आयुष्य, लव्ह आणि सेक्स लाइफ याबाबत बरेच खुलासे केले आहेत. या शोमधील बिंगो राऊंडमध्ये विजय देवरकोंडा कशाप्रकारे मेकअपच्या मदतीने त्याने लव्ह बाइट्स लपवले होते हे सांगितलं. तो म्हणाला, “माझ्या मेकअपमनने कंसीलरच्या मदतीने लव्ह बाइट्स लपवले होते.” याशिवाय आपल्या सेक्स लाइफबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स केलं आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केलं आहे.”

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
neelam shirke opens about healthy competition with aditi sarangdhar
“आमच्यात टक्कर नक्कीच होती, पण…”, अदिती सारंगधरबद्दल नीलम शिर्के काय म्हणाली? सांगितला ‘असंभव’ मालिकेचा किस्सा
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!

आणखी वाचा- रश्मिकासोबतच्या नात्यावर विजय देवरकोंडाचा मोठा खुलासा, म्हणाला “ती माझ्यासाठी…”

विजय देवरकोंडाला जेव्हा करण जोहरने थ्रीसमसंबंधी प्रश्न विचारल्यांतर विजयने दिलेल्या उत्तरामुळे अनन्या आणि करणलाही धक्का बसला. करणने विजयला, “कधी थ्रीसम केला आहे का?” त्यावर विजय म्हणाला, “नाही, पण मी भविष्यात कधीतरी हे करू शकतो.” याशिवाय स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल विजयने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

विजय देवरकोंडाने त्याच्या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये सांगितला. तो म्हणाला, “मला एका चित्रपटात दारू प्यायल्याचा सीन शूट करायचा होता. पण त्यावेळी मी खरंच दारू प्यायलो आणि मी नशेत होतो. नशेत असताना मला माझे संवादच आठवत नव्हते, मी फक्त हसत होतो. निर्मात्यांच्या लक्षात आलं की मी खूप नशेत आहे आणि पुढे शूटिंग करू शकणार नाहीये त्यामुळे त्यांनी अखेर शूटिंग रद्द केलं.”

Story img Loader