अभिनेत्री आलिया भट्टला बालपणापासूनच रणबीर कपूर आवडायचा आणि याची कबुली तिने अनेक मुलाखतींमध्ये दिली होती. आलियाच्या अगोदर रणबीरचं नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. आलिया आणि रणबीरनं एकमेकांना ५ वर्ष डेट केलं आणि त्यानंतर १४ एप्रिल २०२२ रोजी दोघांनी सप्तपदी घेतली. पण या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात कशी झाली याबद्दल कोणालाच माहीत नाही. नुकतंच ‘कॉफी विथ करण’ चॅटशोमध्ये आलियानं रणबीरसोबत तिची पहिली भेट आणि त्यावेळी झालेला रोमान्स याविषयीचा खुलासा केला.

आलिया भट्टने रणबीर कपूरसोबतच्या पहिल्या रोमान्सचा पूर्ण किस्सा ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सांगितला. आलिया आणि रणबीरच्या रोमँटिक नात्याची सुरुवात नववर्षाच्या संध्याकाळी झाली होती. त्यावेळी दोघंही ‘ब्रह्मास्त्र’च्या वर्कशॉपसाठी इस्रायलला जात होते आणि ते दोघंही तेल अविवच्या फ्लाइटमध्ये होते. करण जोहरच्या चॅट शोमध्ये आलियानं त्यावेळच्या आठवणी सांगितल्या.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
madhuri dixit praises hemant dhome fussclass dabhade movie
“हृदयस्पर्शी कथा…”, माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली…
Farooq Abdullah sings bhajan
“तू ने मुझे बुलाया शेरावालिए…”, फारुक अब्दुल्ला यांनी गायलं माता वैष्णोदेवीचं भजन

आलिया म्हणाली, “आम्ही दोघंही ब्रह्मास्त्रच्या वर्कशॉपसाठी तेल अविवला जात होतो. आम्ही फ्लाइटमध्ये होतो. मला आठवतं मी रणबीरला आत येताना पाहिलं आणि मग तो माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. मी खूप उत्साहित होते. आम्ही एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवू असं वाटत होतं. पण पुढच्याच क्षणाला तो माझ्या पुढच्या सीटवर जाऊन बसला. माझ्या बाजूच्या सीटचा काहीतरी प्रॉब्लेम होता ज्यामुळे त्याला दुसऱ्या सीटवर बसवण्यात आलं. त्यावेळी मला वाटलं हे सगळं माझ्यासोबतच का होत आहे. पण नंतर ती सीट ठीक करण्यात आली आणि रणबीर पुन्हा माझ्या बाजूला येऊन बसला.”

आणखी वाचा- Koffee with Karan 7 : “मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स…” रणवीरने केला लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा खुलासा

आलिया पुढे म्हणाली, “जेव्हा आम्ही दोघं नंतर एकमेकांच्या बाजूला बसलो होतो तेव्हा रणबीरनं मला सांगितलं ती त्यालाही पुढे बसण्याचा कंटाळा आला होता. त्यालाही माझ्या बाजूला बसायचं होतं आणि त्याच वेळी सीट खराब झाल्यानं त्याला राग आला होता.” तर अशा रितीने आलिया आणि रणबीरच्या लव्ह स्टोरीचा खुलासा ‘कॉफी विथ करण’मध्ये पहिल्यांदाच झाला. दरम्यान काही दिवसांपूर्वीच आलियानं तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Story img Loader