दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ शोचं (Koffee with Karan 7) सातवं पर्व सुरु झालं आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे यांसारख्या कलाकारांनी या नव्या पर्वामध्ये आतापर्यंत हजेरी लावली. कलाकारांचे चित्रपट ते त्यांचं खासगी आयुष्य यामुळे हा शो अधिक चर्चेत असतो. आता या पर्वाच्या नव्या भागामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हजेरी लावणार आहेत.
आणखी वाचा – “रात्री तीन वाजता फोन करून…” मल्लिका शेरावतचं सिनेसृष्टीबाबत धक्कादायक वक्तव्य
त्यापूर्वी या नव्या भागाचा प्रोमो करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. करण यामध्ये करीना आणि आमिरला विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर मुलांनंतर सेक्स लाईफ बदलली का? याबाबत करण करीनाला विचारतो. यावेळी करीना आणि आमिर त्याला हटके पद्धतीने उत्तर देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
मुलं झाल्यानंतर सेक्स लाइफमध्ये काही बदल होतात का? असा प्रश्न तो करीनाला विचारतो. यावर करीना म्हणते, “याचं उत्तर तुला माहित नाही का?” करीनाचं हे उत्तर ऐकून करण म्हणतो, “माझी आई देखील हा शो बघते. तू जे काही बोललीस ते देखील ती ऐकणार आहे.” करणचं हे उत्तर ऐकताच आमिर देखील या संवादामध्ये सहभाग घेतो.
आणखी वाचा – कारमध्ये शरीरसंबंध ते थ्रीसम, विजय देवरकोंडाचे सेक्स लाइफबद्दल खुलासे
करणने आपल्या आईचा उच्चार करताच आमिर म्हणतो, “जेव्हा तू इतरांच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारतोस तेव्हा तुझी आई शो बघत नाही का?” करीना-आमिरच्या या उत्तरानंतर करण लगेचच पुढचा प्रश्न विचारत असल्याचं या प्रोमोमध्ये दिसत आहे. करीना-आमिरचा हा भाग धमाकेदार असणार हे प्रोमो पाहिल्यावरच लक्षात येतं. येत्या ४ ऑगस्टला हा खास भाग ओटीटीवर प्रसारित होईल.