सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee with karan 7) ची जोरदार चर्चा आहे. शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी करणचे पहिले गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. करोनाच्या संकटानंतर करण जोहरचा शो पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि त्यातून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या पर्सनल आणि सेक्स लाइफबद्दल बरेच खुलासे झाले. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दल या शोमध्ये बरेच खुलासे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रणवीर सिंगनं ‘कॉफी विथ करण’च्या बिंगो सेशनमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्यातील बरीच गुपितं उघड केली. ज्या गोष्टी सांगायला मोठ मोठे सेलिब्रेटी बिचकतात अशा गोष्टी रणवीरनं बिनधास्त सांगितल्या. या शोमध्ये त्यानं व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स केल्याचाही खुलासा केला. रणवीरचं हे गुपित शेअर केल्यानंतर करण जोहरला देखील धक्का बसला. त्याने लगेचच रणवीरला विचारलं, “हे कसं काय झालं? तुला भीती वाटली नाही का की व्हॅनिटीमध्ये कोणीतरी येईल. मी सुरक्षेबद्दल बोलतोय.” त्यावर आलिया म्हणाली, “त्याने आतून दरवाजा लॉक करून घेतला असेल.” एवढ्यात रणवीर म्हणाला, “असं करताना रिस्क असते, पण ते खूप भारी असतं.”

आणखी वाचा- “आम्ही विमानातच रोमँटिक…” आलियाने सांगितला रणबीरसोबतचा ‘तो’ किस्सा

रणवीरचं बोलणं ऐकून करण जोहर देखील हैराण झाला. तो म्हणाला, “व्वा, मी हे कधी ट्राय केलं नाही.” अर्थात रणवीर सिंगचं उत्तर खूपच बोल्ड होतं. पण रणवीर नेहमीच त्याच्या आयुष्याबद्दल बिनधास्तपणे बोलताना दिसतो. त्यानंतर त्याला बरेचदा ट्रोलही केलं जातं पण त्यामुळे रणवीरला काहीच फरक पडत नाही. या शोमध्येही रणवीरनं असंच केलं आणि पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंगनं हजेरी लावल्यामुळे सध्या ‘कॉफी विथ करण’ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दरम्यान या एपिसोडमध्ये रणवीर सिंगने हृतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची हुबेहूब नक्कल केली. त्याचं हे वागणं पाहून आलिया भट्ट आणि करण जोहर दोघंही हैराण झाले होते. याशिवाय रणवीरने आपल्या हुशारीच्या जोरावर रॅपिड फायर राउंडचं हॅम्पर देखील जिंकलं.