सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee with karan 7) ची जोरदार चर्चा आहे. शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी करणचे पहिले गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. करोनाच्या संकटानंतर करण जोहरचा शो पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि त्यातून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या पर्सनल आणि सेक्स लाइफबद्दल बरेच खुलासे झाले. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दल या शोमध्ये बरेच खुलासे केले.

‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीर सिंगने त्याच्या सेक्स लाइफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. विशेषतः बिंगो गेममध्ये रणवीर सिंगने लग्नाच्या पहिल्या रात्री देखील सेक्स केल्याची कबुली दिली. एवढंच नाही तर त्याने सांगितलं की, “आम्ही हे आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही केलं होतं आणि माझ्याकडे सेक्ससाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत.” करण जोहरने रणवीरला, “लग्नाच्या सगळ्या विधी होईपर्यंत तू थकला नव्हतास का?” असा प्रश्न विचारल्यावर रणवीरनं नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला, “नाही, मी फक्त जरा जास्त बिझी होतो.”

Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”

या शोमध्ये रणवीर सिंगसोबत अभिनेत्री आलिया भट्टने देखील हजेरी लावली होती. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल बोलताना आलिया म्हणाली, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो. त्यामुळे ‘सुहागरात’ नावाची कोणतीही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री नसते. लग्नाच्या बाबतीत हे सर्वात मोठी खोटी गोष्ट आहे. पण हे सगळं रणवीरला लागू होत नाही. तो नेहमीच उत्साही असतो.”

आपल्या शोबद्दल बोलताना करण म्हणाला, “आम्हाला २ वर्ष एक कोठडी बंद करून ठेवण्यात आलं होतं. मी बरंच काही केलं पण त्या काळात कोणतीही गोष्ट सोपी नव्हती. जेव्हा या शोचं नावं घेतलं जायचं तेव्हा लोकांच्या नकारात्मक कमेंट येत असत. अशीही वेळ आली होती जेव्हा मला हा शो पुन्हा कधीच करू शकणार नाही असं वाटत होतं.” यावर रणवीर म्हणाला, “हे सगळं चुकीचं आहे आणि या सगळ्यात कोणतंही तथ्य नव्हतं.”

दरम्यान या एपिसोडमध्ये रणवीर सिंगने हृतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची हुबेहूब नक्कल केली. त्याचं हे वागणं पाहून आलिया भट्ट आणि करण जोहर दोघंही हैराण झाले होते. याशिवाय रणवीरने आपल्या हुशारीच्या जोरावर रॅपिड फायर राउंडचं हॅम्पर देखील जिंकलं.

Story img Loader