दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने मागच्या वर्षी अभिनेता नागा चैतन्यापासून घटस्फोट घेतला. या दोघांच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली. सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. मात्र घटस्फोटानंतर सामंथाने त्यावर स्पष्ट बोलणं नेहमीच टाळलं होतं. पण आता ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये तिने घटस्फोट आणि त्यानंतर बदलेल्या आयुष्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं. या शोमध्ये सामंथाने घटस्फोट घेणं किती कठीण आणि वेदनादायी होतं याचा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण जोहरनं सामंथाला या शोमध्ये सामंथाला तिच्या घटस्फोटाबद्दल विचारल्यानंतर सामंथाने हे खूपच वेदनादायी होतं हे कबुल करतानाच त्यामुळे तिला किती त्रास झाला? तसेच तिचं जीवन कसं आणि किती बदललं यावरही भाष्य केलं. हे सर्व सांगताना ती भावुक झाली. करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना सामंथा म्हणाली, “घटस्फोट आणि हे सगळं माझ्यासाठी फार कठीण आणि वेदनादायी होतं. पण सगळं ठीक आहे. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर आता मी पूर्वीपेक्षा जास्त खंबीर झाले आहे.” यावर करण म्हणाला, “म्हणजे आताही परिस्थिती ठीक नाहीये का?” यावर सामंथा म्हणाली, “आता नाही. पण कदाचित भविष्यात सर्व परिस्थिती ठीक होईल.”

आणखी वाचा- “मी माझं मत मांडू शकत नव्हतो”, नागा चैतन्यने केला खुलासा

सामंथा आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा करण्याआधीच त्यांच्या विभक्त होण्याबाबत बऱ्याच अफवा परसल्या होत्या.

पाहा व्हिडीओ –

सामंथाने सोशल मीडियावरून अक्किनेनी हे आडनाव काढून टाकल्यानंतर हे दोघंही वेगळे होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी सामंथा आणि नागा चैतन्य यांनी एक जॉइन्ट स्टेटमेंट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffee with karan season 7 samantha ruth prabhu talk about her life after divorce with naga chaitanya mrj